श्री राजेश्वरी गडावर शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजेचा भव्य सोहळा
संगमेश्वर :-नियाझ खान
शिवप्रेमी तरुण विकास मंडळ (रजि.) व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. १७ मार्च २०२५ रोजी श्री राजेश्वरी गड, ओकटेवाडी येथे पार पडणार आहे.
गडावर शिवजयंतीचा ऐतिहासिक उत्साह
या सोहळ्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. सकाळी ८.३० वाजता भवानी गडावरून मशाल आणण्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर १०.०० वाजता दीपप्रज्वलन व शिवमुर्तीची प्रतिष्ठापना व पुष्पहार अर्पण करण्यात येईल. संध्याकाळी ५.०० वाजता शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
महिलांसाठी दुपारी ३.०० वाजता हळदी-कुंकू समारंभ, पैठणीचा खेळ आणि संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. तसेच ८.३० ते ९.३० वाजता विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ११.०० वाजता श्री. सत्यनारायण महापूजा होणार असून, यानंतर दुपारी २.०० वाजता महाप्रसाद (भोजन) आयोजित करण्यात आला आहे.
रात्री १०.०० वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व १०.३० वाजता मंडळास आर्थिक मदत करणाऱ्या हितचिंतकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास मा. ना. श्री. उदयजी सामंत (उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. आमदार शेखरजी निकम, माजी आमदार सदानंदजी चव्हाण, सरपंच सौ. विशाखा कुवळेकर आणि ग्रामपंचायत सदस्य वसंत उजगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उत्सव समिती व निमंत्रक चेअरमन – श्री. संतोष गोपाळ ओकटे,कार्याध्यक्ष – श्री. तुकाराम धाकू ओकटे,सचिव – मिस्टर कमलेश राजाराम ओकटे,खजिनदार – श्री. मंगेश गुणाजी ओकटे,व्यवस्थापक – श्री राजेश्वरी गडावरील सर्व सक्रीय कार्यकर्ते शिवप्रेमी तरुण विकास मंडळ व महिला मंडळाने सर्व शिवभक्तांना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.