शिवाजी विद्यापीठाचे, कुलगुरु प्रा. डॉ.डी.टी.शिर्के यांची डीकेटीईस सदिच्छा भेट
इचलकरंजी:कयुम शेख
दि 04 डिसेंबरः शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ. डी.टी. शिर्के यांनी डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटला सदिच्छा भेट दिली आणि इन्स्टिटयूटच्या विविध पदाधिका-यांशी चर्चा केली.इचलकरंजी मध्ये कार्यक्रमासाठी आले असता संस्थेने शिवाजी विद्यापीठाचे, कुलगुरु प्रा. डॉ.डी.टी.शिर्के यांना डीकेटीई कॉलेज भेटीसाठी आमंत्रित केले. यावेळी कुलगुरु यांनी डीकेटीईची धावती भेट घेतली. सुरवातीस संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी कुलगुरु यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
मानद सचिव डॉ सपना आवाडे व प्र. संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी डीकेटीईतील नवनविन शैक्षणिक उपक्रम जसे की ५जी लॅब, आयडिया लॅब, सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनओव्हनस इ. प्रकल्पांची विस्तृत माहिती दिली व नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी, वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी झालेला सामंजस्य करार याची माहिती देत पॉलीस मेकिंग व ही पॉलीसी प्रत्येक्षात आमलात आणण्यामध्ये डीकेटीईचा असणारा सहभाग याविषयीही माहिती दिली.
कुलगुरु यांनी मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी शेखर शहा, प्र. संचालिका प्रा. डॉ. एल.एस.अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. व्ही.आर.नाईक यांच्याशी संवाद साधला. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल व शैक्षणिक संस्थानी आमलात आणवायाच्या गोष्टी यावर कुलगुरु यांनी विस्तृतपणे चर्चा केली. त्याचबरोबर डीकेटीई संस्थेचे इंजिनिअरींग एज्यूकेशन मध्ये असलेले कार्य हे खुपच कौतुकास्पद आहे असे नमूद केले. ते म्हणाले, डीकेटीई वस्त्रोद्योगाचे शहर असलेल्या इचलकरंजीमध्ये वास्तव्यास आहे. विविध अभ्यासक्रमामध्ये टेक्स्टाईल एज्यूकेशन देणारी ही एकमेव संस्था आहे व तीचे वेगळेपण जावणते. डीकेटीईचे अनेक परदेशी शैक्षणिक विद्यापीठ व इंडस्ट्रीजशी सुरुवातीपासूनच चांगले संबंध आहेत तसेच माजी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट नेटवर्क आहे. त्यामुळे डीकेटीईचे शैक्षणिक कार्य हे वाखणण्यासारखे आहे असेही ते म्हणाले. इन्स्टिटयूटच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.