दारू नको, दुध प्या’ ह्या अभिनव उपक्रमाने श्रमशक्ती परिवाराने केले अब्दुल लाट येथे नवं वर्षाचे स्वागत
शिरोळ :प्रतिनिधी
दि .१ जानेवारी :नववर्षाच्या स्वागतासाठी श्रमशक्ती परीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गावातील बस स्टैंड चौकात अनोखा उपक्रम घेण्यात आला. जुन्या वर्षाची सांगता व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण युवक मद्यपान करतात. मद्यपान केल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न उदभवत असतात. नवी वर्षाची सुरवात नविन संकल्प करुन केली जाते त्यामुळे श्रमशक्ती परीवाराच्या वतीने अब्दुल लाट मधे दारू नको, दुध प्या उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना दूध देण्यात आले. ‘दारू नको, दुध प्या’, ‘आपण आपले आरोग्य जपुया’ , ‘दारूला नकार, दुधाला होकार’, ‘द दारूचा नाही द दुधाचा’अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
तरुणांचे व्यसनाकडे झुकण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, सर्वांचेच आरोग्य व्यवस्थीत राहण्यासाठी दुध सेवन महत्वाचे आहे तसेच व्यसनमुक्तीसाठी सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत, श्रमशक्ती परीवाराचे प्रमुख कॉ. आप्पा पाटील व कॉ. सौ. जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी विद्योदय परिवाराचे विणायक यांनी बसवलेले व्यसनमुक्ती वरील पथनाट्याचे सादरीकरन करण्यात आले आणि त्यासोबत उपस्थित नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांच्याकडून व्यसनमुक्त समाज निर्मती साठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी उपस्थित नागरिकांना श्री आ.क.कुरुंदवाडे सर,सुरेश अण्णा शेडबाळे,मोहन कांबळे सर, सागर सांगावे, बाबा नदाफ, विनोद ठिकणे, स्मिता काळे, पोपट अक्कोळे, स्वप्नील सांगावे, सुनील सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. ह्या उपक्रमात चैतन्य शिक्षण समूहातील विद्यार्थी, अंगणवाडी मदतनीस सेविका, तरुण वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गिरमल,अभिजित पाटील, नम्रता पाटील, मंगल माळी, प्रथमेश टेळे, सम्मेद गवराई यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.