इंडो इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे” रेखा कला स्पर्धेत” दैदीप्यमान सुयश

कबनूर : हबीब शेखदर्जी 

दि .२१: शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सप्टेंबर २०२४  मध्ये घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल कबनूर या शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायमपणे जपली.

या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी बहुसंख्यने सहभाग नोंदवला. त्या इंटरमिजिएट परीक्षेमध्ये ३३ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ए ग्रेड मध्ये १ विद्यार्थी, बी ग्रेड मध्ये१२विद्यार्थी, सी ग्रेड मध्ये ११  विद्यार्थी, तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी १४  त्यापैकी ए ग्रेड मध्ये २ ,बी ग्रेड मध्ये ३  ,आणि सी ग्रेड ९ विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका सौ.श्यामला गुरव यांचे मार्गदर्शन लाभले .शाळेचे चेअरमन श्री. एन. एन. काझी यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कलाशिक्षिका सौ.श्यामला गुरव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच मुख्याध्यापिका सौ .नाझिया नवाब व संस्थेचे सेक्रेटरी समीरा पिरजादे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अशा अनेक परीक्षेमध्ये विद्यार्थी सहभाग घेऊन उत्तुंग यश मिळवतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×
04:34