कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब कुस्ती केंद्रातील दोन खेळाडूंचे यश

शिरोळ: राम आवळे 
दि.२५ : डेरवण येथे झालेल्या मिनी कोकण ऑलम्पिक स्पर्धेमध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कार्यरत असणाऱ्या कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब व कुस्ती केंद्रातील खेळाडू कु. मयूर अनिल गावडे व कु.गणेश शहाजी गेजगे यांनी सांघिक विजेतेपद पटकावले. त्यांच्या या यशाबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील व दत्ताजीराव कदम ट्रस्टचे अध्यक्ष एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
डेरवण येथे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध खेळांमध्ये ५००० पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला असून सलग दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेत ३८२  पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला आहे. मल्लखांब व रोप मल्लखांब मध्ये मयूर गावडे व गणेश गेजगे यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या संघाला सांघिक विजेतेपद मिळाले. मयूर गावडे हा कै. दत्ताजीराव कदम मल्लखांब कुस्ती केंद्रात चार वर्षे तर गणेश गेजगे हा दोन वर्षापासून सराव करतो आहे. या खेळाडूंना गणपतराव पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष एम. व्ही. पाटील, सचिव निलेश पाटील, ट्रस्टचे सर्व सदस्य, प्रशिक्षक संजय देबाजे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
19:18