ताराराणी पक्षाची विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 
दि .३१:ताराराणी पक्षाच्या वतीने विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त कार्यकारीणीत विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. निवड झालेल्या प्रतिनिधींना माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते व कु. सानिका आवाडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्षाच्या वतीने पक्ष व संघटना मजबुतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्या अनुषंगाने विविध आघाड्यांची स्थापना केली जात आहे. त्यानुसार विद्यार्थी संघटना स्थापन करत त्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. ताराराणी पक्ष कार्यालयात हा नियुक्ती पत्रे प्रदानचा कार्यक्रम पार पडला.
या नवनियुक्त कार्यकारीत शहर उपाध्यक्षपदी फरदीन महात, युवा विद्यार्थी संघटना शहर सरचिटणीस करण माने, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष अखिलेश चौगुले. डीकेटीई कॉलेज राजवाडा उपाध्यक्ष मयूर डांगरे, कार्याध्यक्ष रितेश देसाई, उपाध्यक्ष शाम कोरवी, सरचिटणीस पार्थ पोवार, सचिव निरंजन गावडे, सदस्य विश्‍वदीप हदिमानी, सदस्य ऋषिकेश कांबळे, मूर खुदमनी. वायसीपी कॉलेज अध्यक्ष राजू माधोहाळी, उपाध्यक्ष ओम चव्हाण, उपाध्यक्ष अर्णव कुडचे. डीकेएएससी कॉलेज अध्यक्ष संकेत कांबळे, उपाध्यक्ष समेंद्र शेटे, कार्याध्यक्ष निखील पाटील, उपाध्यक्ष सुनील नागप, सचिव ऋषी मरडी. व्यंकटेश्‍वरा कॉलेज अध्यक्ष यश शेटके, उपाध्यक्ष अभिषेक कबनुरे. एसआयटी कॉलेज अध्यक्ष श्री. आवळकर, उपाध्यक्ष अभिषेक धातुंडे, कार्याध्यक्ष प्रमोद सुर्यपिठ, उपाध्यक्ष जय जाधव, सरचिटणीस रोहित कांबळे, सल्लगार यश बोगाळे यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, युवा आघाडी शहराध्यक्ष सतिश मुळीक, कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुहास कांबळे, युवा विद्यार्थी संघटना इचलकरंजी शहर अध्यक्ष फहिम पाथरवट, माजी पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, माजी शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे, तात्या कुंभोजे, इम्रान मकानदार, अक्षय बरगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×