बांधकाम विभागाकडून कडवई चिखली रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात

बांधकाम विभागाकडून कडवई चिखली रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात

कडवई: संगमेश्वर तालुक्यातील तुरल कडवई चिखली रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. बऱ्याच दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरळ कडवई चिखली रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते.तुरळ कडवई रस्त्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्याला कडवई बाजारपेठेपासून अर्धा किलोमीटर पर्यंत गटारे नाहीत. बाजारपेठेपासून तर खाली नदीकाठापर्यंत रस्ता देखील अरुंद आहे त्यामुळे गटाराला जागाच नाही. पूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण तुरळ ते चिखली करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी काय अडचण आली ते आज पर्यंत त्याचे कारण समजू शकले नाही. या ठिकाणी काही अंतरापर्यंत रस्ता अरुंदच आहे. याच कारणाने पावसाचे पाणी रस्त्यावरून जास्त प्रमाणात जाऊन रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडतात. तरी याकडे सार्वजनिक बांधकाम खाते व ग्रामपंचायत कळवळीने लक्ष देणे गरजेचे आहे. एक तर काही अंतराचे राहिलेले रुंदीकरण करून घेणे गरजेचे आहे कि जेणेकरून या ठिकाणी गटारे काढण्यास मदत होईल व पावसाचे पाणी योग्य रीतीने नदी पात्रात रुजू होईल.
आता उशिराने का होईना सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याला पडलेले खड्डे भरण्याचे काम करण्यात येत असल्याने लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×