दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स या संस्थेचे  ६२  वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

इचलकरंजी: विजय मकोटे 
दि.१४ :संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. सर्वांच्या सहकार्याने संस्थेची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात ४ लाख ५४ हजार इतका नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अहमद मुजावर यांनी दिली.
येथील दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स या संस्थेचे  ६२  वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रास्ताविक व संस्थेच्या कामकाजाविषयी आढावा घेताना चेअरमन मुजावर बोलत होते. सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वप्निल आवाडे यांच्या सहकार्यातून संस्थेची वाटचाल सुरु असून सर्व संचालक, सभासदांनी संस्थेवर टाकलेल्या विश्‍वासामुळे संस्था पुन्हा उभारी घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वप्निल आवाडे यांनी, संस्थेला सर्वच अडचणीतून मुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संस्थेच्या अतिरिक्त जागेवर उभारत असलेले यशवंत संकुल  लवकरच पूर्णत्वास जात आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्याचेही बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. त्यातून संस्थेस कायमस्वरूपी उत्पन्न मिळणार आहे. संस्थेस प्रगतीपथावर घेवून जाणेसाठी संचालक मंडळास योग्य ते मार्गदर्शन करून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
संस्थेचे व्यवस्थापक शफिक मणेर यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. या कार्यक्रमास ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, केएटीपीचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते आदी मान्यवरांसह संचालक सर्वश्री आदित्य आवाडे, मुकुंद पोवार, चंद्रकांत घाटगे, श्रेणिक मगदूम, रवि जावळे, रणजितसिंह गायकवाड, आनंदा दोपारे, रमेश कबाडे, मोहन काळे, योगेश पाटील, राजेश भिसे, सुहास कांबळे, सौ. जेवरबानू दुंडगे, सौ. लक्ष्मी सपाटे व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन राजाराम बोंगार्डे यांनी मानले. सूत्र संचालन संचालक अरुण निंबाळकर यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×