शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ, रस्ता असून बस नाहीत.
राष्ट्रीय मराठा पार्टी ची मागणी
देवणी (लातूर ):सरदार शेख
दि १ : शालेय विद्यार्थाना शिक्षणासाठी उदगीर शहरात जा ये करावे लागत असते परंतु उदगीर आगारातून वेळेत आणि कमी बस सेवा असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जाण्या येण्याची फार अडचण निर्माण झाली आहे वेळेत आणि नेहमो बस सेवा सुरु व्हावी याकारीताचे निवेदन राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातुर विभागीय नियंत्रक जानराव यांना देण्यात आले .
उदगीर करिता येनकी मानकी , होनाळी,भोपनी या मार्गावर धावणाऱ्या बसेस रस्त्याच्या कामानिमित्ताने बंद करण्यात आल्या होत्या ,रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर बस येणे बंदच झाले आहे असे वाटते .कारण किरकोळ एक ते दोनच गाड्या सकाळ संध्याकाळ अशा चालू आहेत, परंतु देवनी येथील कांहीं विद्यार्थी उदगिर शहरात शिक्षण घेत आहेत . त्यांच्या कॉलेज व शालेय वेळे मध्ये एकही बस चालू नसून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जाण्या येण्याची फार अडचण निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये मुलींची संख्या जास्त असल्याने गोरगरीब शेतकर्यांच्या डोक्यावर आगाऊ आर्थिक भार पडत आहे. ही जनतेची अडचण लक्षात घेऊन उदगीर आगाराच्या बसेस चालू करणे बाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातुर विभागीय नियंत्रक जानराव यांना देतांना राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठ मंडळाच्या वतीने देण्यात आले , इंजिनिअर सेल जिल्हा अध्यक्ष संतोष बिरादार, महाराष्ट्रीयन मराठा महासंघ शहर अध्यक्ष जितेंद्र तोडकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी जिल्हा अध्यक्ष अनंत चौधरी. आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 1) उदगीर शिंधीकामठ सकाळी 8.15 ची बस येनकी मार्ग होनाळी देवणी सोडण्यात यावी
2) शिंधीकामठ ते उदगीर सकाळी 9.15 ची बस होनाळी मार्ग येनकी सोडण्यात यावी.3) उदगीर ते शिंधीकामठ दुपारी 3.00 ची बस येनकी मार्ग होनाळी देवणी सोडण्यात यावी.4) शिंधीकामठ ते उदगीर 4.00 ची बस होनाळी येनकी मार्ग सोडण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.