कडवई कुंभारवाडीतील व्यापाऱ्यांची सहल उत्साहात पार पडली

कडवई:(दिपक तुळसणकर)
कडवई कुंभारवाडी येथील दुकानदार व व्यापाऱ्यांची सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. एकूण ३२ व्यापाऱ्यांनी या सहलीत सहभाग घेतला. सहलीदरम्यान अनेक धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली.

सहल दरम्यान खालील स्थळांना भेट देण्यात आली:
1. सप्तशृंगी गड
2. गजानन महाराज मंदिर
3. त्र्यंबकेश्वर मंदिर
4. अंजनीरी हिल्स
5. पंचवटी परिसर
6. सीता गुफा
7. रामकुंड
8. काळाराम मंदिर
9. पांडव लेणी
संपूर्ण सहलीचे आयोजन सुयोग्य नियोजनासह करण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी या सहलीत विविध ठिकाणांची माहिती जाणून घेतली आणि एकमेकांशी संवाद साधत आपले अनुभव शेअर केले. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×