प्रवासी साखरझोपेत, भल्यापहाटे अनर्थ घडला
बुलढाण्यातील अपघाताने अख्खा महाराष्ट्र हळहळला
बुलढाणा:प्रतिनिधी
दि:२७: मे
मुंबई – नागपूर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस आणि कंटेनरच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
बस – कंटेनरचा भीषण अपघात
मुंबई – नागपूर या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील पळसखेडा भागात भीषण अपघात झाला. रातराणी बस आणि कंटनेरच्या अपघातात ७ जणांनी जागीच जीव गमावला असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर१३ जण गंभीर जखमी
या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याची माहिती आहे. या अपघातात १३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रातराणी बस मेहकर आगाराची असून पुण्याहून मेहकरकडे जात होती. बस चालक राजू टी. कुलाल, वाहक पी. आर. मुंढे हे अपघातावेळी ड्यूटीवर होते. सकाळी ६च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून वाहक गंभीर जखमी आहे.घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांसाठी बचावकार्य सुरू केलं.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.