राजवाडी ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद शाळेत विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कडवई: दिपक तुळसणकर 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजवाडी ब्राह्मणवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलाविष्कार २०२५ अर्थात विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा भव्य कार्यक्रम शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, गावकर, पोलीस पाटील, महालक्ष्मी टाइम्स चे पत्रकार दिपक तुळसणकर ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका हर्षदा रेडीज होत्या. तसेच शिक्षक अतुल अनंत कारेकर, बाबासाहेब नानासाहेब सानप, महादेव पांडुरंग ढेरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शैक्षणिक केंद्राचे प्रमुख दीपक यादव यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. नृत्य, नाटिका, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध कलाविष्कारांनी संपूर्ण वातावरण रंगतदार झाले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली कला, हुशारी आणि सृजनशीलता यांचा उत्कृष्ट संगम साधून प्रेक्षकांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शाळेच्या व्यवस्थापन समितीने व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
23:09