मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कला दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाची भेट
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि २५: – शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारा आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान असणारा वस्त्रोद्योग आपल्याही देशात विकसित करावा या उद्देशाने दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाने सुरेशदादा पाटील यांच्या कागल पंचतारांकी औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कला भेट देत माहिती जाणून घेतली.
संपूर्ण भारत देशातील वस्त्रोद्योगापैकी ५० ते६० टक्के वस्त्रोद्योग हा महाराष्ट्र राज्यात आहे. या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून देशभरात नव्हे तर जगभरात उच्च दर्जाच्या कापडाचा पुरवठा केला जातो. हाच वस्त्रोद्योग बरकिना फासो या देशातसुध्दा विकसित करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने वस्त्रोद्योगाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी इद्रिस राउवा, बाटीयानो फेड्रिक आणि बाडो बट्रिन यांच्या शिष्टमंडळाने मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कची निवड केली. त्यानुसार पार्कला भेट देत वस्त्रोद्योगाबद्दल माहिती जाणून घेतली. वस्त्रोद्योगातील माहितीसाठी मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कची निवड केलेबद्दल मेट्रो परिवारातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सुरेशदादा पाटील यांनी वस्त्रोद्योग आणि टेक्स्टाईल संदर्भात सविस्तर माहिती त्यांना दिली. संस्थेचे सुरु असलेले कामकाज पाहून पाहुण्यांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी पार्कचे संचालक भरत पाटील, सुभाष जमदाडे, हेमंत पांडे, ऑर्किटेकट शरद तायवडे-पाटील उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.