मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

रत्नागिरी दि.18:भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 09 नोव्हेंबर 2022 (बुधवार) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 09 नोव्हेंबर 2022 (बुधवार) ते 08 डिसेंबर 2022 (गुरुवार) या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणेच्या आहेत. विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार दावे व हरकती निकालात काढणे,  19 नोव्हेंबर, 2022 (शनिवार) व  20 नोव्हेंबर 2022 (रविवार) तसेच 03 डिसेंबर, 2022 (शनिवार) व  04 डिसेंबर 2022 (रविवार) आहे. दावे व हरकती निकाली काढणे  26 डिसेंबर 2022 (सोमवार) पर्यंत मतदार यादीची अंतिम मतदार यादी प्रसिध्दी  15 जानेवारी 2021 (शुक्रवार).

तालुक्यातील नागरिकांनी 266- स्त्नागिरी विधानसभा मतदार संघामधील मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे, नाव वगळणे नावात बदल अथवा दुरुस्ती करणे, पत्ता बदलणे यासाठी 09 नोव्हेंबर 2022 (बुधवार) ते 08 डिसेंबर 2022 (गुरुवार) या कालावधीमध्ये योग्य तो अर्ज नमुना भरणेसाठी आवाहन करणेत येत आहे. सदरचे अर्ज www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करता येतील.

नव्याने मतदार नोंदणी करणेसाठी नमुना नं. 6 भरणे आवश्यक आहे. (टिप – आपले नाव याआधी   266 – रत्नागिरी विधानसभा मतदार संघाव्यतीरीक्त इतर अन्य कोणत्याही तालुका, जिल्हा, राज्याच्या मतदार संघातील यादीमध्ये नाव असल्यास त्या मतदार संघातील मतदार यादीमधून नाव कमी केलेला दाखला जोडणे आवश्यक आहे.) अनिवासी भारतीय मतदारांचे मतदार यादीत नाव यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी करावायाचा अर्ज नमुना नं.6 अ. मतदार ओळखपत्र आधार कार्डासोबत जोडण्यासाठी नमुना नं.6 ब.  मयत मतदार कायम स्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी नमुना नं. 7 भरणे आवश्यक आहे.  मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करणेकरीता तसेच मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरीता नमुना नं. 8 भरणे आवश्यक आहे. वरील नमुना नं. 6,7,8 व 8अ अर्ज तहसिलदार कार्यालय रत्नागिरी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील. मतदार यादया पुनरिक्षण कार्यक्रमाकामी रत्नागिरी तालुक्यातील सर्व नागरीक, राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन  तहसिलदार रत्नागिरी शशिकांत जाधव यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×