कडवई : मुजीब खान                                                 तालुका अध्यक्ष उदय पवार यांच्या कडे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अनु.जा.विभागाची प्रभारी अध्यक्ष म्हणून जबाबदार मा.उर्जामंत्री तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीनजी राऊत यांच्या आदेशाने घेण्यात आलेल्या कोकणविभागिय मेळाव्या मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ऊपाध्यक्ष विजयभाऊ आंभोरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पद रीक्त असल्यामुळे संगमेश्वर तालुकाध्यक्ष अनुसुचित जाती विभाग उदय पवार यांच्या कडे प्रभारी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे तोंडी आदेश दिले असुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव गौतम आरकडे  यांनी कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले असुन पुढिल वाटचाली साठी आशिर्वाद दिला. उदय पवार हे कोकण रेल्वे कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष असुन साप्ताहिक महालक्ष्मी टाइम्सचे पत्रकार आहेत.प्रशासकिय ज्ञान तसेच संघटन कौशल्य या सर्व गुणांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटि मिळणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना उदय पवार यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा प्रभारी अध्यक्ष घोषीत केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.