यड्राव बँकेला बँको ब्ल्यू रिबन 2023 व नागरी बँक असोसिएशनचा उत्कृष्ट बँक पुरस्कार

जयसिंगपूर-राम आवळे 
दि ३ :कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेली व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली अग्रगण्य अशा यड्राव को-ऑप. बँकेला कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा 150 कोटी ठेवी असलेली उत्कृष्ट बँक हा पुरस्कार असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे एका शानदार सोहळ्यात देण्यात आला, त्याच बरोबर कोल्हापूरच्या अविज पब्लिकेशनकडून बँको ब्लू रिबन – २०२३चा पुरस्कार प्रदान करणेत आला. बँकेने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये केलेल्या चौफेर प्रगतीमुळे हा पुरस्कार बँकेला प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री.अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
बँकेची आर्थिक स्थिती, बँकेने केलेली. चौफेर प्रगती, कर्ज वसुलीचे अचूक व्यवस्थापन केले आहे. याला सभासद ग्राहकांनी सुध्दा बँकेची बाजू समजून घेऊन सहकार्य केले आहे.
बँको हा पुरस्कार रू. 151.00 ते 200 .00 कोटी ठेवी असलेल्या महाराष्ट्रातील सहकारी बँकांमधून प्राप्त झालेला असून, डेल्टीन रिसॉर्ट दमन हो येथे पुरस्काराचे वितरण झाले असून सलग तीन वर्षे बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार प्राप्त झाला आहे, आर्थिक वर्ष 2021, 2022 व 2023 ची उत्कृट बँक म्हणून यड्राव ला पुरस्कार मिळाले आहेत.बँकेचे गृहबांधणी ,वाहन तारण , व्यवसाय, सोने तारण कर्जाचे व्याजदर हे केवळ 9.50% टक्के पासून सुरू असून ते राष्ट्रीयीकृत व कमर्शिअल बँकांपेक्षाही कमी आहेत. रक्कम रू. 15.00 लाखपर्यंतचे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज पुरवठा तत्काळ होणेचे दृष्टीने कमीत कमी वेळेत मंजुरी देणेत येत आहे.
सद्या बँकेने आयएमपीएस, युपीआय, कोड स्कॅनिंगचे माध्यमातून ग्राहकांना सेवा सुरू करीत असून बँकेने ग्राहकांना विविध कर्ज योजना अशा विविधप्रकारच्या सुविधा देत आहे.
सहकारी बँकांना मात्र नियमामध्ये राहूनच कामकाज करावे लागते. त्यामुळे व्यवसायासाठी मर्यादा येत असतात, मात्र तरीही अत्यंत सचोटीने व पारदर्शक कामकाज करून ठेवीवर व कर्जावर आकर्षक व्याजदर ठेवून ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण ठेवण्यामध्ये आपली बँक अग्रेसर आहे, हे याठिकाणी अभिमानाने नमूद करत आहोत असेही अजय पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे.सध्याचे स्पर्धात्मक युगात बँकेचा व्यवसाय वाढीचा आलेख मोठ्या प्रमाणात नसला तरी बँकेने त्यात सातत्य राखले आहे. बँकेस प्राप्त झालेल्या या पुरस्कारामुळे बँकेचे सभासद्, ग्राहक व कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. बँकेचे संचालक मंडळाने राबविलेले धोरण तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवक वर्गाने घेतलेले परिश्रम, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळेच हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची प्रतिक्रिया बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर व संचालक मंडळाने दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×