जिल्हा परिषद नवजीवन मराठी शाळेत सांस्कृतिक कलाविष्कार व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
कडवई|
जिल्हा परिषद नवजीवन मराठी शाळा, गोळवली टप्पा येथे सांस्कृतिक कलाविष्कार व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गीते, चित्रकला आणि अन्य कलात्मक सादरीकरणाद्वारे आपली कला सादर केली.
कार्यक्रमाला सरपंच सौ. शालिनी पतये, उपसरपंच विजय दुदम, पोलिस पाटील आप्पा पाध्ये, विनायक पाध्ये, महालक्ष्मी टाइम्स पत्रकार दिपक तुळसणकर,श्रीकृष्ण खातू, सौ. श्वेता खातू यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चारही गावांचे ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापिका सौ. सानप बाई, सौ. गायकवाड बाई आणि अंगणवाडी सेविका सौ. स्नेहा पोमेंडकर व साहिल चरकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या आयोजनात बाबासाहेब सानप आणि अतुल कारेकर गुरुजी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय सानप गुरुजी, कारेकर गुरुजी, बाटे गुरुजी, नांदिवडेकर गुरुजी, मगर गुरुजी यांनीही कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष किंजळकर, अंकिता चरकरी, तसेच चारही वाड्यांचे वाडी प्रमुख, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्तम प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.