अट्टल चोरटे गजाआड
मोटरसायकल व मोबाईल चोरट्यास जयसिंगपूर पोलिसांना पकडण्यात यश
जयसिंगपूर :- विजय धंगेकर
दि२३नोव्हेंबर :जयसिंगपूरात चोरीचे गुन्हे घडत असताना चोरांना पकडण्यात काहीअंशी पोलिसांना यश 24 तासात येत होते तर काही चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत होते अलीकडे जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गाव व शहरांमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन धूम स्टाईलने हिसका मारून मंगळसूत्र, चैन चोर घेऊन जात होते त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते हे कमी की काय म्हणूनच चोरी करणारे टू व्हीलर, , घरफोडी करत होते याच पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील चोरीचे गुन्हे अजून उघड झाले नाहीत ते उघड करण्यासाठी जे जे उपाय योजना कराव्या लागतील ते उपाय योजना करा असा आदेश पोलीस प्रमुखांनी दिला
पोलीस प्रमुख यांच्या आदेशाची दखल घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्यावतीने रात्रीची गस्त ( पेट्रोलिंग ) चालू केली .याच दरम्यान पोलिसांना यश आले गुन्हे शोध पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पेट्रोलिंग दरम्यान दि. 19 /11 /2021 रोजी रात्री च्या सुमारास एक युवक संशयरित्या लक्ष्मी रोड जयसिंगपूर येथील एका हॉस्पिटलच्या शेजारी आढळून आला त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याचे नाव मयूर बाबय्या स्वामी , वय 21 रा . मंगवती , तालुका अथणी , जि . बेळगाव , राज्य कर्नाटक .असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्याने दिनांक 18 / 11 /21 रोजी जयसिंगपूर पोलीस ठाणे कडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर मधील महिला कामगाराचे बॅग चोरून रोख रक्कम व मोबाईल हँडसेट तसेच बँकेचे एटीएम कार्ड असे चोरी केले आहे अशी कबुली आरोपींनी दिली आहे . सदर गुन्ह्यात अटक करून मा . कोर्टा मध्ये हजर करून 3 दिवस पोलिस कस्टडी घेतली होती पोलिस कस्टडी रिमांड मुदतीत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने दोन महिन्यापूर्वी सांगली व जयसिंगपूर येथून 2 टू व्हीलर व 4 मोबाइल हँडसेट चोरी केल्याचे कबूल केले आहे तसेच आरोपीच्या कब्जात 1 टू व्हीलर,व एक मोबाईल जप्त केला आहे असा एकूण 1,21,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
सदर कारवाईत मा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील सहा . पोलीस उपनिरीक्षक तानाजी गुरव, सुरेश कोरवी , पो. हे .कॉ. निलेश मांजरे, पो. न . बाबा चांद पटेल, रोहीत डावळे, शशीकांत भोसले, माहिला कॉ . प्रभावती सावंत, काशीराम कांबळे, वैभव सुर्यवंशी,आमोल आवघाडे, आभिजीत भातमारे, यांनी कारवाई करून गून्हा उघड केला . व आरोपीस बेड्या ठोकून जेलबंद केले .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.