इचलकरंजीकरांच्या डोळयाचे पारणे फिटले
शिवतीर्थ लोकार्पण सोहळा मोठ्या शाही थारात साजरा.
इचलकरंजी:विजय मकोटे
इचलकरंजीची शान आणि अखंड महाराष्ट्राला असणारं अभिमान अस महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रींमत छत्रपती शिवाजी महाराष्ट्र यांच्या अश्वस्वार पूर्णाकृती पुतळा भोवती उभारण्यात आलेल्या शिवतीर्थचे लोकार्पण खासदार.धैर्यशील माने यांच्या हस्ते व लोकनियुक्त नगराध्यक्षा अॅड सौ अलका स्वामी यांच्या अध्यक्ष खाली व मान्यावरांचा उपस्थितीत शिवशाही थाटात मोठ्या उत्साहात करण्यात आले. हा दैदिप्यमान लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामठात संपन्न झाला. लाखोंच्या संख्येने शिवभक्त इचलकरंजी नगरीमध्ये या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. भव्य मिरवणूक, ढोल पथकाचा नाद, तुतारीचा आवाज आणि ‘जय भवानी जय शिवराय’ या जयघोषाने संपूर्ण इचलकरंजी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण वस्त्रनगरी शिवमय झाली होती. यावेळी सकाळी अभिषेक, त्यानंतर मातंग समाज कडून तोरण , सायकांळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्ठी असा सोहळा पार पडला. या सोहळ्याने इचलकरंजीकरांच्या डोळयाचे पारणे फिटले.
संपूर्ण महाराष्ट्राची नजर वस्त्रनागरिमध्ये संपन्न होणाऱ्या या सोहळ्याकडे होती. आणि अखेर अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य शिवतीर्थाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी छत्रपतींना वंदन करून आदरांजली वाहिली व उपस्थित जनतेला संबोधित केले. मोठ्या डौलाने फडकणारा भगवा छत्रपतींच्या स्वराज्याची साक्ष देत होता. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित असणारा प्रत्येकजण या शिवमय वातावरणामध्ये मंत्रमुग्ध झाला होता. या शिवमय लोकार्पण सोहळ्यास आमदार प्रकाश आवाडे, मा.आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राजु बाबा आवळे, बालाजी उद्योग समुहाचे मदन कारंडे, शिवतीर्थ समितीचे पुंडलिक जाधव .बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती. या नेत्रदिप लोकार्पण सोहळ्यास सुमारे दोन लाख लोकांनी हजरी लावली असल्यांची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.