इचलकरंजीत सार्वजनिक गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत

१ उपविभागीय पोलिस अधिकारी, १३ अधिकारी, १५२ कर्मचारी २९५ होमगार्ड , ४ फिरते पथक, एसआर पीएफ पथक तैनात.

इचलकरंजी : विजय मकोटे

दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी १० दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत पार पडले . शहरातील मानाचा गणपती व बिर देव मंदिरातील श्री ची मूर्ती विसर्जनासाठी सजवलेल्या पालकीत ठेवण्यात आली होती .

येथील शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ मानाच्या गणपती व बिर देव मंदिरातीत श्री ची आरती व पुजन नगराध्यक्ष अॅड सौ अलका स्वामी यांच्या हस्ते व , उपनगराध्यक्ष श्री तानाजी पोवार, मुख्याधिकारी श्री प्रदीप टेंगल, प्रांताधिकारी डॉ विकास खरात, अप्पर पोलिस अधिक्षक सौ जयश्री ताई गायकवाड, उप विभागीय पोलिस अधिकारी श्री बी.बी. महामुनी, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . त्यानंतर विसर्जनासाठी मानाचा गणपती व श्री मुर्ती पालकीतून मार्ग स्त झाले . यावेळी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी आणि अप्पर पोलिस अधिक्षक सौ जयश्री ताई गायकवाड यांनी पालकी ला खांदा दिला .

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी . डिजे , याला प्रशासनानी बंदी घातल्यामुळे जय गणेशाच्या गपपती बाप्पा मोरऱ्या गर्जरात गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला,. शहापूर येथील खाणीत आज गणेशाचे विसर्जन होत होते . त्याकरीता पालिका प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली होती . या ठिकाणी पोलिस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता . शहरातील विसर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी एक अप्पर पोलिस अधिक्षक एक उपविभागीय पोलिस अधिकारी, १३ अधिकारी, १५२ कर्मचारी .२९५ होमगार्ड , ४ फिरते पथक, एसआर पीएफ पथक . असा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस मित्र,रेस क्यु फोर्स सामाजिक कार्यकर्ते, हे विसर्जन सुखरूप होण्यासाठी विशेष मेहनत घेत होते .

सकाळपासूनच शहापूर खाणीत श्री गणेश मुर्तीचे विसर्जन सुरु होते. सायकाळी जिल्हा पोलिस प्रमुख श्री शैेलेश बलकावडे ,यांनी शहापूर येथील विसर्जन ठिकाणी भेट देवून विसर्जनाची पहाणी केली यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक जयश्रीताई गायकवाड , उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी यांच्या उपस्थितीत शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री यादव, व सहाय्य क पोलिस निरिक्षक श्री खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी शांततेत व भक्तीभाव वातावरणात गणेश विसर्जन पार पाडत होते. शहापूर येथील नगरसेवक भाऊसो आवळे,बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, आरोग्य सभापती संजय केंगार, उपनगराध्यक्ष श्री तानाजी पोवार यांच्याकडून गणेश मंडळांना गणेश विसर्जनासाठी विशेष मदत होत होती.

रात्री ९.३० वाजेपर्यत ६९९ घरगुती गणपती आणि २५३ गणेश मंडळांच्या मुर्तीचे असे एकूण ९५२ मूर्तीचे विसर्जन झाले .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×