जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

इचलकरंजी:विजय मकोटे
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना केन कमिटी चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुुल प्रकाश आवाडे यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, विलास गाताडे, प्रकाश मोरे, एम. के. कांबळे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, यांच्या हस्ते राहुल आवाडे यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.   

वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तत्पूर्वी इंदुकला निवासस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आवाडे कुटुंबियांच्यावतीने डॉ. राहुल आवाडे यांचे औक्षण करुन सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.शुभेच्छा देणार्‍यांमध्ये उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, दलितमित्र अशोकराव माने, दिलीप मुथा, राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, अशोकराव सौंदत्तीकर, प्रसाद खोबरे,  जवाहर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, आदगोंडा पाटील, किरण कांबळे, शेखर पाटील, पुष्कर आश्रमचे ट्रस्टी सत्यनारायण पारीक, हरिद्वार भवनचे अध्यक्ष रामस्वरुप पुरोहित, सुरेश व्यास, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, धोंडीलाल शिरगांवे, प्रशांत कांबळे, सुरज बेडगे, पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील, अभय काश्मिरे, नगरसेवक मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, कॉ. सदा मलाबादे, मिलिंद कुरणे, नुतन मुथा, अरिफ आत्तार, दत्ता धुमाळे, सुरज हुल्ले, साहिल आळतेकर, सचिन कांबळे, उमेश कांबळे, अविनाश कांबळे, प्रमोद बेलेकर, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, राजू बोंद्रे, रणजित जाधव, सतिश मुळीक, दादा भाटले, रमेश कबाडे, महावीर कुरुंदवाडे, नाना पाटील, नरसिंह पारीक, सर्जेराव पाटील, चंद्रकांत इंगवले, प्रा. पी. व्ही. कडोले, श्रेणिक मगदूम, सचिन हेरवाडे, राहुल घाट, राजाराम बोंगार्डे, शेखर शहा, गोगा बाणदार, कपिल शेटके, बाळासाहेब माने, सुरज राठी, नरेश हरवंदे, शितल पाटील, शशिल धुर्वे, कोंडीबा दवडते, रमेश पाटील, अनिल शिकलगार, नितेश पोवार, श्रीरंग खवरे, अभिजित बचाटे, शांताराम लाखे, अनिल कुडचे, सतिश कोष्टी, बंडोपंत लाड, श्रीकांत टेके, सागर मुसळे, महालक्ष्मी टाइम्सचे संपादक फिरोझ शेख, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आदींसह कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी, कोरोची, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, पट्टणकोडोली, यळगुड, साजणी ग्रामीण भागातील मान्यवर, पदाधिकारी, आवाडे समर्थकांचा समावेश होता. तर दूरध्वनीवरुन नवीमुंबईचे आमदार रमेशदादा पाटील, भाजपाचे चेतनदादा पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×