इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने पूर्णाकृती पुतळा बसविण्यास राज्य शासनाने मंजूरी
इचलकरंजी –विजय मकोटे
दि .६ :इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने पूर्णाकृती पुतळा बसविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करुन तो तातडीने शासनाकडे पाठवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आजच्या आणि येणार्या पिढीला धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीचा स्फुर्तिदायक इतिहास कळावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी त्याप्रमाणे वर्तन करावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा इचलकरंजी शहरात शासनाकडून उभारण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या संदर्भात विविध संघटना व शिवप्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने व लोकभावनांचा आदर करत आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी या संदर्भात पाठपुरावा सुरु ठेवला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कॉ. के. एल. मलाबादे चौकात पुतळा उभारण्याबाबत मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याला मंजूरी देत या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा असे आदेश दिले आहेत. त्या संदर्भातील प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून द्यावा, असे आमदार आवाडे यांनी पत्रात म्हटले आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.