सचिन पाटोळे यांची बळीराज सेना तालुका सचिव पदी नियुक्ती
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि.६: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन पाटोळे यांची बळीराज सेना तालुका सचिव पदी नियुक्ती करणात आला . माघजन येथे कार्यक्रमा मध्ये बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री अशोक वालम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश भायजे यांच्या हस्ते तालुका सचिव पदी नियुक्तीपत्र देण्यात आले.
राजकारणा वरील असलेली मजबूत पकड तसेच त्यांच्या पंचक्रोशी मधे असलेले सक्रिय असे राजकीय पाठबळ, सामाजिक सहकार्याची भूमिका असल्याने जन सेवक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तर त्यांच्या या नियुक्ती मुळे संगमेश्वर तालुक्यातील बळीराज सेनेचा हात अधिक बळकट व मजबूत करण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील असे बळीराज सेनेचे नेते आणि पदाधिकारी यांनी सांगितले आहे.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मा.श्री.सुरेश भायजे महाराष्ट्र उपाध्यक्ष,श्री.रमेश कानावले महाराष्ट्र उपनेते,श्री.दत्ताराम घोगले महाराष्ट्र उपनेते,श्री.प्रभाकर धनावडे चिपळूण संगमेश्वर संपर्कप्रमुख,श्री.संजय गोंधळी संगमेश्वर संपर्कप्रमुख, श्री.नितीन लोकम संगमेश्वर तालुकाध्यक्ष,श्री.दत्ताराम लांबे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष,नवनिर्वाचित नियुक्त संगमेश्वर सचिव श्री. सचिन पाटोळे,श्री.सुनील भुवड, श्री.रुपेश गोताड,श्री.गणपत गोटेकर,श्री.संतोष गोटेकर,श्री.सुरेश कानाल, श्री.प्रदीप घेवडे, श्री.शांताराम घागरे, श्री.संदीप गीते उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.