कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे आंतरराष्ट्रीय ‘कृष्णनिती इन बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयावर टॉकशो चे आयोजन
इचलकरंजी –विजय मकोटे
दि.५ :ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या उच्च आणि तार्किक नितींमुळे प्रत्येक घटनांचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केले. त्यानुसार आपणसुध्दा आपला व्यवसाय अधिकाधिक उच्च स्तरावर नेऊ शकतो. आजचे आधुनिक स्पर्धात्मक युग गतीशील असले तरी जुने सिध्दांत आजही अत्यंत व्यावहारिक आहेत, आपले व्यवसाय चे नेटवर्क चे विस्तारीकरण करणे गरजे चे आहे,असे प्रतिपादन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. गिरीशजी जाखोटिया यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा, श्री महेश सेवा समिती, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महेश भवन इचलकरंजी येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ. गिरीशजी जाखोटिया यांचे ‘कृष्णनिती इन बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयावर टॉकशो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत सखोल मार्गदर्शन केले.
स्वागत महेश सेवा समितीचे सचिव लक्ष्मीकांत बांगड यांनी तर प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नितीन धूत यांनी केले. यावेळी महेश सेवा समिती अध्यक्ष द्वारकाधीश सारडा, न्यासी प्रमुख बेनीगोपाल मुंदडा, चंदनमल मंत्री यांच्या हस्ते गिरीशजी जाखोटीया यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोष्णीवाल, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड, महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड महासभेचे कार्यसमिती सदस्य भिकुलाल मर्दा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे सहमंत्री मनमोहन कासट, तालुका सभा अध्यक्ष रामगोपाल मालाणी व्यासपीठावर उपस्थित होते।
कार्यक्रम ला श्रीगोपाल दरगड,शांतीकिशोर मंत्री, श्रीकांत मंत्री,घनश्याम इनाणी,गोपाळ बजाज रामनिवास मुंदडा, रमाकांत मालू सह बहुसंख्यक समाज बंधु व युवा वर्ग उपस्थित होते।कार्यक्रम यशस्वी करणे साठी भंवरलाल लोया, श्रीकांत बंग, माधवनारायण राठी, अशोककुमार मंत्री, बालकिशन टुवानी,हरीश सारडा,अशोक भुतडा, राजेश बाल्दी दिनेश बाहेती, गोकुल बागड,अमित काबरा आणि सर्व संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले।चर्चासत्राच्या आयोजनात श्यामसुंदर मर्दा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्र संचालन जिला सचिव लालचंद गट्टाणी व युवा संगठन सचिव कृष्णकांत भूतडा यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.