शाहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; अंगणवाडीत वाद, मारहाण व धमकीप्रकरणी सहा जणांवर कारवाई
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२ मार्च २०२६ : शाहापूर पोलिस ठाणे गु.र.नं.६७/२०२६ अन्वये भा. दं. सं. कलम १८९ (२) ३९१ (२),३९० ३५२(२) ३५१ (३ ) २२३ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ४३५ प्रमाणे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी रणजित शंकरराव माने (वय ४५ , व्यवसाय – शिक्षक, रा. जी.के. नगर, तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास जी.के. नगर, तारदाळ येथील अंगणवाडी क्रमांक ४३ च्या मैदानात हा प्रकार घडला.
तक्रारीनुसार, आरोपी तानाजी बापू तळे हे अंगणवाडीत सुट्टी करत असताना फिर्यादी यांच्या पत्नींनी “विनोद तू रेकॉर्डिंग का करतोस?” असा जाब विचारला. यावरून आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. तसेच आरोपींनी इतर ८ ते १० अनोळखी इसमांना बोलावून गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद दत्तात्रय कोराणे, शिवराज विनोद कोराणे, तानाजी बापू तळे, विश्वनाथ बाबासाहेब माजरे, अधिक रघुनाथ जगताप यांच्यासह इतर अनोळखी इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि. २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.५० वा. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका वाघमारे व पोहेका कोळी करत आहेत.
पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.