रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड

खेड :नियाझ खान 
दि. 10: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने  जिल्हा प्रेरणा मेळाव्याचे आयोजन चिपळूण येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते. या प्रेरणा मेळाव्यात नवीन जिल्हा कार्यकारणी  सन २०२ ५ ते २०२७  साठी निवड करण्यात आली असून  अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.  
            यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव विजय परब,विजय पोटफोडे, सचिन गोवळकर, सचिन मोहीते तसेच  मंडणगड, खेड, चिपळूण, लांजा, संगमेश्वर, देवरुख, राजापूर, गुहागर, येथील शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
*नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे*
        उपाध्यक्ष विलास कोलपे, विजय कांबळे, प्रधान सचिव सुहास शिगम, संदीप गोवळकर,  विविध उपक्रम कार्यवाह भिमराव गगंणे,  वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प कार्यवाह अनंत पवार, सोशल मीडिया व्यवस्थापन कार्यवाह मनोज तानू जाधव, कायदेविषयक कार्यवाह ऍड स्मिता कदम,  संविधान जागर कार्यवाह महावीर  मिसाळ,  संपर्क व समन्वय विभाग कार्यवाह  युयुत्सु आर्ते यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सचिन गोवळकर, विजय परब, तानू आंबेडकर, युयुत्सु आर्ते यांनी कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×