शरद इन्स्टिट्युटच्या तीन संशोधन प्रकल्पांची निवड

अविष्कार प्रकल्प कल्पना स्पर्धा : विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड

यड्राव: राम आवळे 

दि .२४ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन संशोधन प्रकाल्पांची ‘अविष्कार २०२६’ विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे. एका प्रकल्प कल्पनेला सुवर्ण तर अन्य दोन कल्पनेला रौप्य पदक मिळाले असून विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण विभागातून २५० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. सहापैकी तीन श्रेणीमध्ये शरदच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा विभागात ‘आधुनिक वेअरहाऊस ऑपरेशन्स आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी बुद्धिमान ऑटोमेशन’ ह्या प्रकल्प कल्पनेला प्रथम क्रमाक मिळाला. हा प्रकल्प अभिषेक खोत, सौरभ चव्हाण, संकेत अभंग यांनी केला. त्याना प्रा. धनश्री बिरादार यांचे मार्गदर्शन मिळाले.

            विज्ञान विभागात ‘शैवाल सौर बायो-पॅनेलची बायोफोटोनिक वैशिष्ट्ये’ ह्या प्रकल्पाला व्दितीय क्रमांक मिळाला. हा प्रकल्प इलेक्ट्रीकल विभागातील अरमान कुलकर्णी, विश्वजीत सूर्यवंशी, आदर्श मगदूम, विजय मदभगत यांनी केला आहे. त्यांना डॉ. मंगेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.मानवता, भाषा आणि ललित कला विभागात ‘गतीची कला: पुनर्परिभाषित मानवी आणि संगणक संवाद’ ह्या प्रकल्पाला व्दितीय क्रमांक मिळाला. हा प्रकल्प कॉम्प्युटर सायन्स विभागातील वैदेही फडके, मैथिली कदम, वैदेही चौगुले, मनाली चिगरे यांनी केला असून त्यांना प्रा. के.एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.

       ह्या तीन्ही संशोधन प्रकल्पांची विद्यापीठ स्तरावरील ६ जानेवारी २०२६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्ऩॉलॉजीकल विद्यापीठ, लोणेरे येथे होणा-यी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  विद्यार्थ्यामध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात आविष्कार-महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरु केले आहे. यामध्ये शरद इंजिनिअरिंगचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी यश संपादन करीत आले आहेत.अविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सचिन गुरव, प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यी, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.