संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

याच दिवशी “इंडिया एआय अभियान” सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्षवर्धन सालुंखे उपाध्यक्ष, व्हीसी टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर, अनुप कारेकर संशोधन प्रमुख अवकाश व प्रगत संशोधन,व्यापारीकरण व तंत्रज्ञान प्रा. लि.; आंतरराष्ट्रीय खगोल व अंतराळ संघटनेचे राजदूत, तसेच आशुतोष पवार वरिष्ठ संगणक प्रणाली अभियंता, रिव्होल्युशन आयटी सोल्युशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट व्ही. गिरी, कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण उपस्थित होते.


हा संपूर्ण कार्यक्रम इन्स्टिट्यूटच्या कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सिद्धी जोशी हिने केले, तर प्रा. सागर चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.