न्यू गोल्डन सर्कसचे कबनूरमध्ये शानदार उद्घाटन

कबनूर :हबीब शेखदर्जी 

दि.१९ :येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात, अमोल बेकरीसमोर कबनूरच्या मैदानात ‘सुपरस्टार न्यू गोल्डन सर्कस’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.या सर्कसचे उद्घाटन युवा नेते प्रमोद पाटील, प्रसिद्ध उद्योगपती चंद्रकांत हिंदलकर, पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा सनदी, कोरोची गावचे सरपंच डॉ. संतोष भोरे, भारतीय जनता पार्टीचे कबनूर अध्यक्ष बबनराव केटकाळे, माजी सरपंच सुधीर पाटील तसेच पत्रकार व सामाजिक नेते पापालाल सनदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवाजी चव्हाण, सचिन सुतार, महेश कांबळे, अनिल सुतार, निहाल मुल्लानी, बेलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्कसचे मालक पांडू माने यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना सांगितले की, प्रेक्षकांसाठी विविध थरारक व मनोरंजक खेळांची मेजवानी सादर करण्यात आली आहे. यात झोपाळा खेळ, सायकल रेस, पिंजऱ्यातील मोटरसायकल (मृत्यूचा सापळा) यांसारखे थरारक प्रयोग तसेच देश-विदेशातील कलाकारांचे आकर्षक सादरीकरण पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी या सर्कसचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे स्वागत महाव्यवस्थापक राजू राज (केरळ) यांनी केले, तर आभार समाधान जेधे यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.