उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडीया ब्रेड असोशिएशन च्या “सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट” या पदावर सलग नवव्यांदा फेरनिवड.

जयसिंगपूर : राम आवळे 

दि. १३ मार्च २०२६ : ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंटपदी चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची सलग नवव्यांदा फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे झालेल्या संस्थेच्या ४०व्या वार्षिक संमेलनात सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.याचवेळी परफेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एच. के. बत्रा यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. देशभरातील बेकरी उद्योगातील मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने या संमेलनात उपस्थित होते.

गणेश बेकरी नांदणी प्रा. लि. व चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन आण्णासाहेब चकोते यांच्या औद्योगिक तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल यावेळी घेण्यात आली. संमेलनात गणेश बेकरी नांदणीचे प्रतिनिधित्व सेल्स कॉर्पोरेट हेड ऋतुजा चकोते व कॉर्पोरेट हेड अभिषेक चकोते यांनी केले. नव्या पिढीचे नेतृत्व करताना त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली आहे.

संमेलनात बेकरी उद्योगाच्या विकासासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आखाती युद्धाचा उद्योगावर होणारा परिणाम, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, जागतिक स्पर्धा, शासनाचे नियम तसेच भारतीय बाजारपेठेत बेकरी उत्पादनांविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासंबंधी विचारमंथन झाले.

भारतीय बेकरी उद्योगातील बहुमोल योगदानाबद्दल स्व. राम अवतार गुप्ता यांना मरणोत्तर ‘लाईफटाईम अवॉर्ड (२०२५-२६)’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र शिवकुमार गुप्ता (कार्यकारी संचालक, आशाराम अँड सन्स प्रा. लि.) यांनी स्वीकारला.

कार्यक्रमाला सोनिक बायोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक गिरीश मतलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयचे संचालक आशुतोष अग्रवाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मागो (किट्टी ब्रेड), उपाध्यक्ष अरविंद सिंघल (ब्रिटानिया इंडस्ट्रीज), शिवकुमार गुप्ता (आशाराम अँड सन्स), ट्रेझरर संदीप आहुजा (मिल्कमेड) यांच्यासह देशभरातील बेकरी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.