शरद इंजिनिअरिंगमध्ये महिला दिनानिमित्त १२२ जणांचे रक्तदान
यड्राव: राम आवळे
दि १८ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रक्तदान शिबिरामध्ये १२२ विद्यार्थी, प्राध्यपकांनी रक्तदान केले. महिला दिनानिमित्त आर्टिफिशल इंटेलिजेन्स विभाग, आर्टिफिशल इंटेलिजेन्स इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएसन व राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. शिबिराचे उद्धघाटन संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अनिल बागणे म्हणाले, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. एका रक्तदात्यामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. आजच्या तरुण पिढीने केवळ तांत्रिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, जबाबदारी आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण होते. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.”.यावेळी ब्लड बँकेचे सतिश मेटे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यामध्ये रक्तदानाचे फायदे, रुग्णांसाठीचे महत्व याची विद्यार्थी व प्राध्यापकांना माहिती दिली.
यावेळी विभाग प्रमुख डॉ. गोविंदसिंग पटेल, आर्टिफिशल इंटेलिजेन्स इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएसन समन्वयक प्रा. ऋतुजा नलवडे, अध्यक्ष प्रद्युम्न वडेर, एनएसएस समन्वयक प्रा. एम.पी. उदगांवे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थीत होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.