इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२४ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दि. २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भगतसिंग उद्यान येथे स्वातंत्र्यवीर शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करून देशभक्तीपर वातावरणात त्यांना आदरांजली वाहिली.

याप्रसंगी परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, माजी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, सहाय्यक आयुक्त नितीन बनगे, प्रमोद बचाटे, संदीप जोशी, प्रभारी उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, महेश बुचडे, परशराम पोवार, दिलीप मगदूम, मनोज खंदारे यांच्यासह उद्यान विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन इचलकरंजी महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात आले होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.