कबनूर नगरपरिषदेची लवकरच घोषणा होणार
राज्य सरकारने निवडणूक आयोगास पाठवले पत्र
मुंबई : दि. २१ . कोल्हापूर जिल्हातील कबनूर ( ता. हातकणगले ) नगरपरिषदेची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे . यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणूक आयोगास पत्र पाठवले आहे तसेच कबनूर नगर परिषदसाठी परवानगी ही मागितली आहे. नगरविकासाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर यांच्या सहीने बुधवारी निवडणूक आयोगास याबाबतचे पत्र दिले आहे. कबनुरला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी कृती समितीने लोकलढा उभारला होता.
२० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता नगरपरिषदेच्या हालचाली वेग मिळाला आहे .चार दिवसांपूर्वी यासंदर्भात इचलकरंजी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश आवाडे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले होते. प्राथमिक प्रक्रिया सुरु झाल्याने कबनूर ग्रामस्थांतून आता समाधान व्यक्त होत आहे. कबनूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि वेळ मारून नेणाऱ्या कारभाराला खो बसा वा आणि गावचा कारभार स्वच्छ पारदर्शक व्हावा यासाठी माजी उपसरपंच निलेश पाटील, नगर परिषद कृती समिती अध्यक्ष दत्ता शिंदे, उत्तम जाधव, विकास फडतारे, इम्रान सनदी, रवी धनगर, शकील मुल्ला, राहूल महालिंगपुरे तसेच कृती समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.कबनूर नगर परिषदला मंजूरी मिळाल्यास जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघ रद्द होणार आहे. नगरपरिषदेची प्रक्रिया सुरु झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्यांची चांगलीच गोची झाली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.