इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २३ सप्टेबर :श्री आर्य चाणक्य पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न व्यवसाय करून नफा मिळवणे हेच फक्त उद्दिष्ट न ठेवता समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी श्री आर्य चाणक्य नागरिक सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. चालू आर्थिक वर्षात पतसंस्थेला 2 कोटी 15 लाख रुपये इतका नफा झाल्याचे पतसंस्थेचे प्रतिपादन अध्यक्ष जवाहर छाबडा यांनी केले.
श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे बुलढाणा को ऑप सोसायटीचे सीईओ शिरीषजी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जवाहरजी छाबडा म्हणाले, पतसंस्थेने कोरोना सारख्या कठीण काळात ही चांगली प्रगती केली आहे. संस्थेचे स्व भांडवल साडेआठ कोटी रुपये असून 155 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. या ठेवीमध्ये चालू आर्थिक वर्षात 15 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. पतसंस्थेने 108 कोटी रुपये कर्ज पुरवठा केला आहे. निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. संस्थेला दोन कोटी पंधरा लाख रुपये इतका नफा झालेला आहे. फक्त व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी ही पतसंस्थेने जपली आहे. गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये 60 ते 70 लाख रुपये इतके अर्थसहाय्य गोरा गोरगरीब विद्यार्थ्यांना केले आहे. संस्थेने शहरातील मध्यवस्तीत जागा घेतले असून त्या ठिकाणी लवकरच ग्रंथालय अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुणे बुलढाणा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सीईओ श्री.शिरीषजी देशपांडे म्हणाले, पतसंस्थेच्या कायद्यात अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शासन दरबारी लावून धरली आहे मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. सर्व पतसंस्थांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्या रेटल्या पाहिजेत. शासनाच्या धोरणामुळे पतसंस्थेच्या अनेक योजना बंद कराव्या लागतील का अशी शंका येत आहे. पतसंस्था या सामाजिक जाणिवेतून उभे राहिल्या आहेत आणि अशा संस्थांच्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न शासन करू पाहत आहे. त्याला सर्वांनी विरोध केला पाहिजे. सहकारातून समृद्धी आणि समृद्धीतून सामाजिक विकास करणे हे आमचे उद्दिष्ट आहे ते आम्ही करत आहोत. संचालकांच्या वर्तणुकीवरच पतसंस्थेचे भविष्य आणि भवितव्य अवलंबून असते.आर्य चाणक्य नागरिक सहकारी पतसंस्था सारख्या चांगल्या पतसंस्था महाराष्ट्रात आहेत त्यामुळे अनेक लोकांना त्याचा आधार ठरत आहे. उपाध्यक्ष राजेंद्र राशिनकर यांनी अहवाल वाचन केले.तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पोवार यांनी सभेच्या नोटिसीचे वाचन केले त्याला उपस्थित सभासदांनी एकमताने मान्यता दिली.प्रारंभ कै.रामभाऊ राशिनकर आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नियमित कर्जदारांना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये
ब्राम्हण सभेचा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्या बद्दल दत्तात्रय जोशी यांचा, महेश गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल नंदकिशोर भुतडा यांचा, दुबईत होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्सल स्पर्धेत निवड विनायक राशीनकर यांचा तर पुणे जनता बँक संचालक पदी निवड झाल्याबद्दल श्रीकांत पोतनीस यांचा,सीए परीक्षा पास झाल्याबद्दल सौ श्वेता रोहित देसाई, जय अभिजीत हारुलगे 6 व्यां नेपाल इंटरनॅशनल हीरोस् स्पर्धेत योगा व कराटे मध्ये गोल्ड पोझिशन तसेच अल्टिमेट खो खो साठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक उदय भागवत, पंकज मेहता, शांतिनाथ शिरगावे, सुकुमार देवमोरे, राकेश अग्रवाल, सौ लीलाबाई शिंदे, प्रकाश गायकवाड, अरविंद कुलकर्णी, पंडित ढवळे,कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
नरोत्तम लाटा यांनी आभार मानले.अरविंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.सौ रानडे यांनी वंदे मातरम् म्हटले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.