सौ.शुभांगी कांबळे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर-: प्रतिनिधी
दि. २ मोन्हेंबर :इचलकरंजीची कन्या केनवडे ता.कागल येथील जि.प.शिक्षिका.सौ.शुभांगी सरदार कांबळे यांना क्रांतीज्योत महात्मा फुले “आदर्श शिक्षिका ” हा राज्यस्तरीय पुरस्कार  कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कास्ट्राईड राज्य शिक्षक संघटना कार्याध्यक्ष रविंन्द्र पालवे,महासचिव,नामदेवराव कांबळे,आमदार प्रकाश आबिटकर,शिक्षक आमदार जयंत आसगांवकर,माजीमंत्री आमदार हसनसो मुश्रीफ शिक्षण संचालक  प्राथमिक शरद गोसावी,शिक्षण संचालक,विकास गरड,पुणे माजी शिक्षण संचालक महावीर माने यांचेसह राज्यातील शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.शुभांगी कांबळे यांचे सर्व शिक्षण इचलकरंजी येथे झाले असून त्यांचे सासर सिध्दनेर्ली ता.कागल असून त्यांचे पतीही शिक्षक असून त्यांच्या पतीचे सासर,माहेर कडील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.इचलकरंजी टाईम्सचे संपादक शैलेंन्द्र चव्हाण यांची कन्या होय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.