इचलकरंजीत दिनांक 04 ते 08 जानेवारी 2024 पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि: ९रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक है. महासत्ताच्या सहकार्याने 04 ते 08 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्यानजीक ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी भव्यपणे साकारत आहे. या वर्षाचे रोटरी ट्रेडफेअरचे 23 वे वर्ष आहे.
इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यकमासाठी वापरली जाते. गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बेंचेस, स्वच्छतागृह, डोळयाचे ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने, ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व इतर उपकम घेतले जातात.
या वर्षी लेडीज व जेंट्स डेस मटेरियल, आर्टीफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू गृहोपयोगी उत्पादने, मोबाईल, दुचाकी व गारमेंट मशिनरी विभाग, वॉटर प्युरिफायर इ चे स्वतंत्र विभाग मांडणेत येणार आहेत. खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनविलेले खादयपदार्थांचे विविध प्रकारचे फूड स्टॉल असणार आहेत. आईस्किम, फूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यकम, मुलांच्याकरिता मीनी वर्ल्ड असणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सुबक मांडणी केली असून, नागरिकांना प्रदर्शन पाहणेकरिता रूंद व प्रशस्त रस्ते, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मेंटने आच्छादित तसेच चोविस तास विशेष सुरक्षा, व सीसीटीव्ही (cctv) स्टेज शो, कराओके गाणी, मिमिकी चे उत्कृष्ठ कार्यकम, आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ इ चे आयोजन ही यावर्षीची खास वैशिष्टे आहेत.
इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे. स्टॉल बुकींगकरिता रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन रो. महादेव खारगे (9822665858), रो. संजय खोट (9422412346), रो. रविंद्र नाकील (9422461000), रो. संजय घायतिडक (9326605212) रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते (9422582420) सेक्रेटरी रो. पंक कोठारी (9823095907), बॅनर जाहीरात साठी रो. राजू पाटील (9822535300) यांच्याशी संपव साधावा. असे आव्हान रोट्ररी ट्रेड फेअर समितीच्या वतीने करण्यात आला आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.