शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामीण रुग्णालय नविन इमारत व प्रमुख रस्ते व गटर्ससाठी 62 कोटीचा निधी मंजूर

आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर)

जयसिंगपूरराम आवळे 
दि .११ राज्य विधिमंडळाचे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विकास कामासाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करण्यात आला यामध्ये शिरोळ तालुक्यातील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स कामासाठी 45 कोटी तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकांमासाठी 16 कोटी व शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथे संरक्षक भिंत्त (कंपाउंड) साठी 1 कोटी रुपये असे एकूण 62 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिली
शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स करणे तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले होते व त्यापासून रुग्णांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांची गेली अनेक दिवस नवीन इमारत बांधकामासाठी वारंवार मागणी होती, तसेच शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथील संरक्षक भिंत बांधणे कामीही मागणी होती त्यामुळे आपण राज्य शासनाकडे या सर्व कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या हिवाळी अधिवेशनात या सर्व कामांना निधी मंजूर करण्यात यश आले तसेच या कामी राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब व आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांचे सहकार्य मिळाले आहे त्यामुळे त्यांचे आभार मानले.
शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता, येथून पुढील काळात देखील तालुक्यातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना विकास कामासाठी शासनाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहोत असेही आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी सांगितले.

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधकामासाठी दि.13/03/2023 रोजी प्रस्ताव दिला होता, त्यानंतर दि.23.08.2023 रोजी या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली होती व चालू हिवाळी अधिवेशनात या ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला. त्यामुळे आता दत्तवाड ग्रामीण रुग्णालय रु.16.40 लाख रुपयांची सुसज्ज अशी नवीन इमारत मिळणार आहे त्यामुळे अनेक वर्षाच्या मागणीची पूर्तता करणेत आली याचे समाधान आहे, असे आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी सांगितले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.