प्रलंबित तपासावरील प्रकरणांमधील चार्ज शीट लवकरात लवकर नोंदवा
- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापुर:प्रतिनिधी
दि. ३१ : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकित जिल्ह्यातील पोलीस तपासावरील विविध प्रलंबित प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष राहुल रेखावार यांनी घेतला. यावेळी त्यांनी पोलीस तपासावरील प्रलंबित २३ प्रकरणांचा आढावा घेवून जलद तपास व कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करुन चार्ज शीट दाखल करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत 7 प्रकरणांमधे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. तसेच इतर २४ कागदपत्रांअभावी प्रलंबित प्रकरणांचा आढावाही घेतला. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सचिन साळे यांनी माहिती सादर केली. बैठकीला पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनीधी अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, पोलीस निरीक्षक नाहसं पथक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, अशासकीय सदस्य शहाजी गायकवाड, संतोष तोडकर, लता राजपूत, अविनाश बनगे, संजय कांबळे, निवृत्ती माळी उपस्थित होते.
मागील सभेचा कार्यवृतांत वाचून सभेची सुरुवात झाली. यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या तथापी कागद पत्रांअभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित असणाऱ्या २४ प्रकरणांचा बाबनिहाय आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्ह्यातील ७ प्रकरणांमध्ये सर्व पुर्तता झालेल्या प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.