हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.१३: ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील विविध समाजांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली.विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी व इतर समाजाचा सहभाग वाढविणे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.प्रारंभी उपसंचालक प्रवीण टाके यांनी बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला. बंजारा समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती लखन पवार व रतन चव्हाण यांनी दिली. बैठकीत वसंत नाईक यांचाही सहभाग होता.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी फारूक बागवान, सहाय्यक संचालक वृषाली पाटील व उपसंपादक रणजीत पवार आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.