कोल्हापूर: संतोष कांबळे
दि .१३ :संजय घोडावत विद्यापीठातर्फे दरवर्षी कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ साठी मकरंद अनासपुरे (कला व समाजसेवा), स्वप्निल कुसळे (क्रीडा), डॉ. अशोक पुरोहित (वैद्यकीय), डॉ. अनिल पाटील (शिक्षण) आणि महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (उद्योग) यांची निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संजय घोडावत यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रांगणात प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार वितरणाबाबत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी घोषणा केली. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांचे योगदान:
✅ मकरंद अनासपुरे – मराठी सिनेमा आणि रंगभूमीतील नावाजलेला अभिनेता; “नाम फाउंडेशन”च्या माध्यमातून समाजसेवा.
✅ स्वप्निल कुसळे – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत भारताचे प्रतिनिधित्व.
✅ डॉ. अशोक पुरोहित – प्रसिद्ध ईएनटी सर्जन, सांगली.
✅ डॉ. अनिल पाटील – महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान.
✅ महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज – प्रगत उत्पादन तंत्रज्ञानामधील ५० वर्षांहून अधिक अनुभव.
सांस्कृतिक सोहळ्याची रंगत
संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस विविध कलाविष्कार आणि गुणदर्शनाच्या माध्यमातून साजरा होणार असून, महाराष्ट्रातील अनेक मान्यवर, उद्योजक आणि अधिकारी या भव्य सोहळ्यास हजेरी लावणार आहेत. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे मत विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केले.