डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

देशपातळीवरील अभियांत्रिकी स्पर्धेत पॉप्युलर चॉईस अ‍ॅवार्ड पुरस्काराने सन्मान

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

दि.१३ः येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील चार विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथे ’इमटेक्स-२०२६’ या जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशीनरी टुल्सचे प्रदर्शनात संपन्न झालेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये पॉप्युलर चॉईस अ‍ॅवार्डने पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. बेंगलूरु येथे पार पडलेल्या या प्रदर्शनात डीकेटीईतील मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये शिकणा-या अनुज लुगडे, हर्षवर्धन हरगुडे, सोहम बिरनाळे व शरवील लोखंडे या विद्यार्थ्यांनी प्रा. सुयोग रायजाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या एक्झॉस्ट टू प्रिंटर इंक कन्वहटर व्हिथ स्मार्ट पीयुसी किट या पेटंटप्राप्त नाविण्यपूर्ण प्रकल्पाला प्रतिष्ठतेचा पॉप्युलर चॉईस अ‍ॅवार्ड प्रदान करण्यात आला. सदर प्रकल्प डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये विकसीत केला आहे.
‘इंडियन मशीन टुल्स मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन’ (इमटेक्स) यांच्या विद्यमाने जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशीनरी टुल्सचे प्रदर्शन बेंगलोर येथे भरवण्यात आले होते.  जगभरातील सुमारे हजार हून अधिक अत्याधुनिक अ‍ॅटोमेटीक मशीनरी मॅन्युफॅक्चरर  नामांकित कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत देशभरातील ४० हून अधिक अभियांत्रिकी कॉलेजमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि संशोधनातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये वाहनांच्या धुरांतून बाहेर पडणारे हानिकारक कार्बन कण विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने गोळा करुन त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचे प्रिंटर शाईमध्ये रुपांतर केले जाते. पर्यावरण संरक्षणाचा विचार करुन तयार करण्यात आलेले हे तंत्रज्ञान भविष्यात प्रदुषण कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्मार्ट पीयुसी प्रणालीमुळे वाहणातून होणारे प्रदूषण तात्काळ डॅशबोर्डवर दिसून येते ही प्रणाली आरटीओशी ऑनलाईन जोडली असल्यामुळे पीयूसी तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सोपी होण्यास मदत होणार आहे. तसेच कारखाने व औद्योगीक क्षेत्रातही धूर व उत्सर्जन नियंत्रणासाठी आणि यंत्रसामग्र्रीच्या देखभालीबाबत वेळेवर सुचना मिळवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल अशा दृष्टीने याचा प्रभावी वापर करता येईल. प्रत्येक फेरीमध्ये विचारल्या जाणा-या तांत्रिक प्रश्‍नांना डीकेटीईचे विद्यार्थी गुणवत्ता सिध्द करीत होते यामध्ये बौध्दीक, तांत्रिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जनरल नॉलेज व मुल्यांकन या सर्व स्तरावर डीकेटीईचे विद्यार्थी पात्र ठरुन त्यांना पॉप्युलर चॉईस अ‍ॅवार्ड गौरविण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. आडमुठे मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.