संगमेश्वर तालुका कँरम असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिलीप विंचू

*तालुका कँरम असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिलीप विंचू*

देवरूख:

संगमेश्वर तालुका कँरम असोसिएशनच्या अध्यक्ष पदी जेष्ठ कँरमपटू दिलीप विंचू यांची निवड करणेत आली.संगमेश्वर तालुका कँरम असोसिएशन ची सभा नुकतीच देवरूख येथिल सागर शेट्ये यांच्या कल्ब येथे संपन्न झाली. त्यात तालुक्याची नविन कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्ष-दिलीप विंचू,उपाध्यक्ष-बाबा दामुष्टे,सचिव-दत्ता नार्वेकर,सहसचिव-मोहन हजारे,कार्याध्यक्ष-मनमोहन बेंडके,खजिनदार-सागर शेट्ये,सल्लागार-सुरेंद्र देसाई,सदस्य-राहूल भस्मे,पवन भोई,दामू साळसकर.बाळू घाणेकर. मनोज जाधव,सुमित रेवणे,विजय कोंडविलकर, आगाशे,रवी शिंदे यांची निवड करणेत आली.

तालुक्यात कँरमचा असलेला लौकीक कायम ठेवून नविन खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून  कँरमचा प्रसार करून कँरमपटू घडविणेसाठी तालुक्यातील प्रत्येक पंचक्रोश स्पर्धाचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल.महिला व मुलींनी जास्तीत जास्त सहभाग कँरम खेळाकडे नोंदवून हा खेळात अग्रेसर व्हावे यासाठी सर्वांना बरोबर घेत काम करू असे नुतन अध्यक्ष दिलीप विंचू यांनी सांगितले.

163