माया पोषकच्या चिपळूणमधील पहिल्या दालनाचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते थाटात शुभारंभ

चिपळूण :
शुद्ध खा तंदुरुस्त रहा अशी टॅगलाइन घेउन देवरुखात सुरु झालेल्या माया पोषक या लाकडी घाण्यातील शुद्ध तेलाच्या चिपळूण मधील पहिल्याच दालनाचा शुभारंभ आज संध्याकाळी मोठ्या थाटात करण्यात आला.सई आर्केड,पाग,चिपळूण येथे सुरु झालेल्या या नव्या दालनाचा शुभारंभ चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वासुदेव मेस्त्री जिल्हाध्यक्ष सुतार समाज रत्नागिरी,चंद्रकांत खोपटकर तालुकाध्यक्ष सुतार समाज चिपळूण,शामकांत कदम उद्योजक चिपळूण,राजाभाऊ गानू उद्योजक देवरुख,जयंता राजवाडे उद्योजक,दिलीप नरळकर,चंद्रकांत वाडकर ,ओंकार पिळवलकर, निकेत काणेकर आर्किटेक खेड,दशरथ पोफळकर खेड,रवींद्र गायकर हॉटेल सद्गुरू चिपळूण आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे स्वागत अवधूत मेस्त्री आणि सौ विदुला मेस्त्री यांनी केले.

  

     या नव्या दालनात शेंगदाणा तेल,खोबरेल तेल,मोहरी तेल,जवस तेल,करडई तेल,तिळ तेल,बदाम तेल,जिवन अमृत,केश अमृत,मसाज तेल,सेंद्रिय गुळ,सेंद्रियगुळ क्रिस्टल पावडर,सेंद्रिय गुळ कॅंडी,सेंद्रिय गुळ पावडर,सैंधवमिठ,शुद्ध हळद पावडर,लसूण चटणी,मेतकूट,डांगरपिठ,कुळीथ पिठ,घावणे पिठ,आंबोळी पिठ,थालीपीठ भाजणी,उपवास भाजणी,कोकणी वडे पिठ,नाचणी पिठ,नाचणी सत्व,तांदूळ पिठ,मोदक पिठ,ज्वारी पिठ,चकली भाजणी,कोकम सिरप,कोकम आगळ,आवळा सिरप,पाचक,आमसूल (कोकम)उपलब्ध करून देण्यात आले आहे.

433