ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी’ची वसंतदादा कारखान्यावर धडक, पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये झटापट

सांगली:प्रतिनिधी

दि:१०:डिसेंबर: सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (रविवार, १० डिसेंबर) उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.