इचलकरंजी – विजय मकोटे
दि .२५जुन: बिरला शक्ती सिमेंटच्या हातकणंगले तालुक्यातील विक्रेत्यांचा मेळावा व ‘मान्सून स्कीम’ योजनेत सहभागी विक्रेत्यांना भेटवस्तू प्रदान सोहळा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी दीडशेहून अधिक विक्रेते उपस्थित होते.
कार्यक्रमास बिरला शक्ती सिमेंटचे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल सेल्स हेड निशाद जोशी, कोल्हापूर व सांगली ब्रँच हेड जयवंत लोखंडे, सेल्स प्रमोटर नितीन धूत, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोशिएशनचे अक्षय सातपुते व हर्षल धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कंपनीचे टेक्निकल इनचार्ज महेश कोले यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन करत सिमेंटच्या गुणवत्तेची माहिती विषद केली. प्रास्ताविकात सेल्स प्रमोटर नितीन धूत यांनी, कंपनीच्या वतीने विक्रेत्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर या योजनेत सहभागी होणार्या विक्रेत्यांना आयफोन फाईव्ह, वॉशिंग मशिन, लॅपटॉप, मोबाईल, टॅब, मायक्रो ओव्हन, ट्रेडमिल आदी भेटवस्तू देण्यात येत असल्याचे सांगितले. नवीन योजनेत सहभागी 85 हून अधिक विक्रेत्यांनी नवीन योजनेचा लाभ घेतला असल्याचे सांगितले. यावेळी हर्षल धूत यांनी उपस्थित मान्यवरांचे राजस्थानी पगडी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांनी, बिरला शक्ती कंपनीला हातकणंगले तालुक्यातील सर्वच विक्रेत्यांनी दिलेली साथ बहुमूल्य असून तालुक्यात उच्चांकी विक्री झाल्याचे सांगत इथून पुढच्या काळातही आपण अशीच साथ द्यावी, असे आवाहन केले. तसेच कंपनीच्या कार्याचा आढावा घेत 28 विक्रेत्यांना कंपनीने श्रीलंका देशाची टूर घडविल्याचे नमुद केले.
रिजनल सेल्स हेड निशाद जोशी यांनी, कंपनीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नवनवीन योजनांची माहिती दिली. यावेळी नवीन योजनेचा लाभ घेतलेल्या विक्रेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी कंपनीचे कंपनीचे ब्रँच मॅनेजर दीपक सावंत, अनिल भंगे, आदींसह हातकणंगले तालुक्यातील विक्रेते उपस्थित होते. आभार जयवंत लोखंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव उपासे, शिवानंद गुरव, अरुण आवटे, ऋषिकेश हांडे, जितेंद्र मगदूम, अमोद मकोटे अभिनंदन बलवान आदींनी परिश्रम घेतले.