संभाव्य महापूराचा व अति वृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी महानगर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज:-

आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे

चलकरंजी : विजय मकोटे

दि .१२ :कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या पार्श्व भूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवणेचे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते. या अनुषंगाने आज शुक्रवार दि.१२ जुलै रोजी पुर परिस्थितीमध्ये जीवीत हानी टाळण्यासाठी खरेदी केलेल्या नवीन रिमोट कंट्रोल लाईफ बॉय ड्रोन आणि यांत्रिक फायबर बोटीचे पुजन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव,शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, पोलिस निरीक्षक राजु ताशीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आले.


त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिका आपत्कालीन विभागा मार्फत पंचगंगा  नदीघाट येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व यंत्र सामग्रीच्या प्रात्यक्षिकाचे (डेमो) सादरीकरण करणेत आले. यावेळी आपत्कालीन विभागा कडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची आणि श्री लक्ष्मी नारायण गौसेवा प्रतिष्ठान, इचलकरंजी यांच्या हायड्रोलिक ॲनिमल कॅरियर व्हॅनची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिका सह दिली. यामध्ये यांत्रिक बोट, साधी फायबर बोट, स्टिल कटर,वुड कटर ,लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर,टॉर्च, स्लायडिंग शिडी , बायनाक्युलर ईत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म,
औषध फवारणी ट्रॅक्टर,सक्शन ट्रॅक्टर याचा समावेश आहे.यावेळी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असले बाबतची माहिती आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी घेवुन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास जिवीत अथवा वित्त हानी होवू नये यासाठी अचूक नियोजन करणेच्या सुचना दिल्या.
याप्रसंगी अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, सहा. लेखापरिक्षक दिलीप हराळे, पाटबंधारे विभागाचे आवळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, ॲसि. मेकॅनिक अनिल कांबळे, फायर फायटर जवान, आपत्कालीन विभागाकडील कर्मचारी तसेच श्री लक्ष्मी नारायण गौ सेवा प्रतिष्ठानचे शरद बाहेती, वीर रेस्क्यू फोर्सचे रुपेश खरवार, लक्ष्मी प्रोसेसचे विठ्ठल चव्हाण, पोलिस बॉईजचे सतिश चव्हाण, सर्पमित्र रमन आमने, पट्टीचे पोहणारे विष्णू लवटे यांचेसह महापुराच्या काळात महानगर पालिका प्रशासनास सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे, शहरातील प्राणी मित्र उपस्थित होते.