संगमेश्वर:(मुजीब खान)
संगमेश्वर पोलिस निरीक्षक पदी अमित यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अमित आनंदराव यादव हे रत्नागिरी सायबर ठाणे या ठिकाणी पोलिस निरीक्षक पदी कार्यरत होते.
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांची रत्नागिरी सायबर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे.पोलीस निरीक्षक स्मिता सुतार ह्यांनी मार्च 2024 मध्ये संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता.त्यांनी गेल्या सहा महिन्याच्या कार्यकाळात पोलिसांच्या सहकार्याने व जनतेला विश्वासात घेऊन ऊत्तम प्रकारे कार्यभार सांभाळला होता. त्यांची सहा महिन्यातच रत्नागिरी सायबर ठाण्यात त्या पूर्वी असलेल्या ठिकाणीच बदली झाली असून, त्या ठिकाणी असलेले पोलीस निरीक्षक अमित यादव यांची संगमेश्वर पोलीस ठाण्यात बदली झाली असून ते लवकरच येथील पदभार स्वीकारणार आहेत.