संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन प्रकरण,जि.प.कडून शाळेच्या मुख्याध्यापिकेचे निलंबन

 

कडवई:  (02/09/2024)

जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी किंजळे यांना त्या शिक्षकाचे प्रताप माहीत हाेते. त्याने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याची कल्पनाही त्यांना होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न करता किंवा वरिष्ठांना न कळविता त्या गप्प राहिल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मुख्याध्यापिकेवरही निलंबनाची कारवाई केली आहे.याबाबत शनिवारी निलंबनाची नाेटीस बजावली आहे.