- इचलकरंजी: विजय मकोटे
सेवाभरती व हेमंत वरुटे युवा मंच, एकलव्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीशील्ड चा पहिली व दुसरी लस देण्यात आला. इचलकरजी शहरातील नागरिकांची कोरोनापासुन संरक्षण व्हावे यासाठी सेवा भारती व हेमंत वरुटे युवा मंच तसेच एकलव्य प्रतिष्ठाण यांच्या पुढाकाराने कोव्हिशिल्ड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.या लसीकरण शिबिरामध्ये प्रभाग 19 मधील अनेक नागरिकांनी पहिली व दुसरी लस घेतली. प्रामुख्याने महिलांना या शिबिराला भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .आठरा वर्षांवरील सर्व तरुण-वयोवृद्ध व्यक्ती शिबिरामध्ये लस घेण्यासाठी आले. यावेळी एकलव्य प्रतिष्ठान कडून लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला मास्कचे वाटप करण्यात आले.
या शिबिराला महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, शहराध्यक्ष अनिल डळ्या, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष अश्विनी कुबडगे, भाजपा सरचिटणीस अरुण कुंभार,अरविंद शर्मा,अमर कांबळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, बालकृष्ण तोतला, सुनिल मुंदडा,युवा मोर्चा उपाध्यक्ष सुजय पवार, उपाध्यक्ष नामदेव सातपुते, गणेश वरुटे, राजेंद्र पाटील, शुभम बरगे, प्रदीप माळगे, अनिस म्हालदार ,अभिजित गाडे,करण लाटणे, ऋषिकेश वरुटे, गायत्री वरुटे, उमेश लाटणे, महेश आळंदे यांनी भेट दिली
शिबिर यशस्वी करण्यात सेवा भारती चे नरोत्तम लाटा ,सहकार आघाडी अध्यक्ष पुष्कर उत्तुरे, एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप वरुटे, शिवशक्ती युवक मंडळ सुतार मळा भागातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.