कोल्हापूर :योगेश कांबळे
समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कोरोना काळात कार्य करणाऱ्या व्यक्तींचे कोवीड योध्दा म्हणुन माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या वतिने सन्मानित करण्यात आले आहे.
तालुक्यातील पत्रकार रुग्ण वाहिकेचे वाहन चालक , रुग्णसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य जाम महामार्ग चौकीच्या वाहनचालक , रुग्णसेवक यांना सन्मानित करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, यांच्या हस्ते कोविड योद्धा्यांना सन्मानीय करण्यात आले.
यावेळी माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासदादा पठारे, महा. प्रदेश महिला अध्यक्ष शिल्पा बनपुरकर, विदर्भ अध्यक्ष कीशोर मुटे, वर्धा जिल्हा अध्यक्ष अश्विन बोंदाडे, शालंगडी देवस्थानचे वासुदेव महाराज, शैलैश झाडे, भाउराव कोटकर , प्रफुल सिरसागर, विनोद नक्षिणे ,माधवी नरड, पौर्णिमा म्हैस्के, सचिन महाजन व सर्व माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाचे सदस्य उपस्थित होते.